सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
15

गोंदिया : खासदार (राज्यसभा) प्रफुल पटेल यांच्या विकास निधीतून मंजूर तीन लाख रुपयांच्या खर्चाने निर्मित होणार्‍या ग्राम खळबंदा येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य कुंदन कटारे होते. तसेच अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष बालकृष्ण पटले उपस्थित होत. याप्रसंगी सरपंच कुंदा काटेवार, उपसरपंच दीपक कापसेकर, द्वारका साठवणे, प्रल्हाद काटेवार, सुधीर कांबळे, श्रीराम घासले, सुनील भुजाडे, राधेश्याम शेंडे, लक्ष्मण कांबळे, कुंजीलाल घासले, आशिफ कांबळे, राहुल हुमणे आदी उपस्थित होते.