पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

0
18

गोंदिया,दि.१६ : पोलिओ रोगाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता राष्ट्रीय पल्‍स पालिओ मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत ५ वर्षाखालील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला पोलीस विभागाचे होम डिवायएसपी रामदास राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.वाहुरवाघ, डी.बी.सायंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू, डॉ.गाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे डॉ.अमरीश मोहबे, डॉ.सुरेश लाटने, डॉ.संजय आसुरकर, दिव्या भगत, प्रा.सविता बेदरकर, आकृती संस्थेचे प्रमुख डॉ.प्रमोद गुडधे, डॉ.मनिषा येळे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी ० ते ५ वर्षे बालकांकरीता पल्स पोलिओ लसीचे महत्व समजावून सांगितले व पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. रॅलीमध्ये राधाबाई नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, डी.बी.सायंस कॉलेज व एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी पल्स पोलिओ जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या व माहितीपत्रके वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, जिल्हा क्षयरोग केंद्राच्या जिल्हा समन्वयक प्रज्ञा कांबळे यांनी संयुक्तरित्या केले. तर उपस्थितांचे आभार पल्स पोलिओ मोहिमेचे नोडल ऑफिसर डॉ.विनोद वाघमारे यांनी मानले. रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.