पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

0
22

गोंदिया,दि.16 : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज (ता.17) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी 10 वाजता सडक अर्जुनी येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत बैठक. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव. दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे पत्रकार परिषद. दुपारी 2 वाजता कशिश लॉन गोंदिया येथे राष्ट्रीय समता संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता गोंदिया येथून बघोली ता.गोरेगाव कडे मोटारीने प्रयाण. सायंकाळी  6 वाजता बघोली येथे भागवत कार्यक्रमास उपस्थिती. कार्यक्रमानंतर (सोईनुसार) गोंदिया येथून नागपूरकडे मोटारीने प्रयाण करतील.