अभ्यासापूर्वी ध्येय ठरवा – मंजुताई चंद्रिकापूरे 

0
12
सालेकसा,दि.१६ : : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर कठीण परिश्रमाबरोबरच ठरवलेला ध्येय महत्वाचा ठरतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाNया विद्याथ्र्यांनी अभ्यासापूर्वी जिवनातील ध्येय ठरवूणच ठवलेल्या क्षेत्रानुसार अभ्यासाचे नियोजन करावे. अथक परिश्रमाची जिद्द बाळगावी यश तुमचेच आहे. असे प्रांजळ मत सेवानिवृत्त प्राचार्य मंजुताई चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
 सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्पेâ तुकडोजी महाराजांच्या सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत स्थानिक स्वामी विवेकानंद अध्ययन कक्षाच्या वतीने स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबीर आणि गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यस्थानी सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिक्षक तथा राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव चंद्रिाकपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अधिकारी लखनसिंह कटरे, मुख्याध्यापीका ए.एम.कठाणे, मुख्याध्यापक बहेकार, मुख्याध्यापक कान्हेकर तथा उद्योजक राजु डोंगरे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. स्थानिक तरूणांनी श्रमदानातून साकारलेल्या अध्ययन कक्षात अभ्यास करून शासकीय नोकरीत निवड झालेल्या यशस्वी विद्याथ्र्यांचा सत्कार दरवर्षीच करण्यात येतो. यावर्षी सैनिकी सेनेत दाखल झालेल्या कमलेश हेमणे या तरूणाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन चंद्रकुमार बहेकार यांनी केले. प्रास्ताविक दिलीप पाथोडे तर आभार प्रदर्शन लोकेश चुटे यांनी केले. यशस्वीतेसाठी गावकNयांनी सहकार्य केले.
३५० रुग्णांना शिबिराचा लाभ
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी सप्ताहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हृदयरोगतज्ञ डॉ.एल.एल.बजाज, डॉ.राजीद खान, डॉ.तारेश शेंडे, डॉ.मुकेश बोपचे आदिंसह त्यांच्या चमुने रुग्णांची ईसीजी, सुगर, बी.एम.डी., युरीक अ‍ॅसीडसह रोगांची तपासणी केली. दरम्यान रुग्णांना मोफत औषध वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी औषधी प्रतिनिधी अरूण चुटे, विनोद डोये, नरेंद्र टेकाडे, सुदेश कटरे, सागर शिवणकर, संतोष समरीते, अंकुश डिब्बे, गौरव ब्राम्हणकर, नमीत चव्हाण, रोशन, गुरूदास गिNहीपुंजे, ललीतसिंह पवार आदिंसह भजेपारवासीयांना परिश्रम घेतले.