आजपासून वाटप :जिल्हा होणार ‘एलईडी’ने प्रकाशमान

0
12

 

गोंदिया दि.१९ : विजेचा वाढत असलेला वापर लक्षात घेता त्यावर आवर घालण्याच्या दृष्टीने ग्राहकांना आता एलईडी बल्बचे वितरण करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या या ‘डोमेस्टिक इफीशियंट लाईटनिंग प्रोग्राम’ अंतर्गत प्रत्येक वीज मीटर धारकाला (ग्राहकाला) हे एलईडी बल्ब दिले जाणार असून मंगळवारपासून (दि.१९) जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. कमी वीज जाळून अधिक उजेड देणारे एलईडी बल्ब असल्याने आता जिल्हा एलईडीच्या उजेडाने प्रकाशमान होणार आहे.गोंदियात रामनगर व सुर्याटोला विज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीज बिल घेऊन जाणायास हे बल्प मिळणार आहे.

विजेच्या वाढत्या वापरामुळे वीज निर्मितीसाठी खनिज संपत्तीचा ऱ्हास होत चालला आहे. यावर वेळीच नियंत्रण घालण्यात आले नाही तर खनिज संपत्तींसह पर्यावरणावरही धोकादायक परिणाम होणार यात शंका नाही. याकरिता वीजेची वाढत चाललेली मागणी व त्यावर आळा घालण्याच्या उद्देशातून केंद्रीय उर्जा मंत्रालयाने एलईडी बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एलईडी बल्ब कमी वीज जाळून जास्त उजेड देतात. जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वीज मीटर धारकाला (ग्राहकाला) एलईडी बल्ब दिले जाणार आहे.

केंद्र शासनाच्या एनर्जी इफिशिएंसी सर्विसेस लिमीटेड (ईईएसएल) या कंपनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात असून यासाठी जिल्हास्तरावर एजंसी देण्यात आली आहे.  जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू होणार असून जिल्ह्यात सुमारे दोन लाख वीज मीटर धारक असल्याने त्यांना हे एलईजी बल्ब पुरविण्याच्या दृष्टीने एजन्सीची तयारी सुरू आहे.प्रायोगीक तत्वावर महावितरणचे मुख्य अभियंता जनवीर, अधिक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, सहायक अभियंता सुहास धामनकर,इंजी.हरीष डायरे यांच्या हस्ते काही लोकांना सोमवारी बल्बचे वितरण करण्यात आले.