सरकारचा फोलपणा जनतेसमोर मांडा-खा.पटेल

0
6

गोंदिया,दि.१९ सोशल माध्यमाचा वापर करून देशभरातील नागरिकांना भ्रमित करणारे केंद्रांतील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या तीन-दोन वर्षाच्या काळात युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. शेतकèयांचे शेतातील उत्पन्न घटले आहे. त्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे. शेतकèयांना अपायकारक ठरणाèया घोषणा सरकार मांडत आहे. महागाई वाढतच आहे. रुपयाची qकमत पंतप्रधानाच्या वयाच्या वर गेली आहे. आपले पंतप्रधान विदेश वाèयात धन्यता मानत आहेत. देशातील उद्योगपतीवर ६ लाख कोटी रुपयाचे कर्ज असताना ते सोडून काही हजार रुपयाचे कर्ज असणाèया शेतकरी आणि सामान्य नागरिकांना सरकार आणि भारतीय रिझव्र्ह बँक त्रस्त करीत आहे. आपण सर्वांनी मिळून विरोधी पक्षातील असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारचा फोलपणा जनतेसमोर मांडावयाचा आहे. विरोधातील लोकांना काहीही बोलण्याचा आणि मागण्याचा अधिकार आहे असे बोलूनच त्यांनी सत्ता हस्तगत केली होती. विरोधात असल्याचा अधिकाराचा वापर करून सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचवा असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्र्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पटेल पुढे म्हणाले केंद्रातील सरकार घोषणावर घोषणा करीत आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार सुद्धा घोषणा करण्यातच धन्यता मानीत आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून केलेल्या घोषणा केवळ कागदावरच राहणार आहेत. नुकतीच केंद्राने घोषणा केलेली पीक विमा योजनेची मसुदा काय आहे हे कळण्यास मार्ग नाही. केवळ घोषणा करून धन्यता मानणारे हे घोषणाबाज सरकार आहे असा आरोप यावेळी पटेल यांनी बोलतांना केला.
२०१३-१४ मध्ये युपीए सरकारचे शेवटचे वर्ष होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव प्रति बॅरल १४० डॉलर असताना रुपयाची qकमत ५५ रुपयाच्या आसपास होती. सरकारला तेल खरेदीसाठी ८ लाख ४० हजार कोटी रुपये लागायचे. २ लाख ५० हजार कोटी रुपये सबसिडी द्यावी लागायची. तरीही देशात पेट्रोलची qकमत २९ डॉलर प्रति बॅरल असताना तेल खरेदीसाठी देशाला शक्त २ कोटी रुपये मोजावे लागतात. त्यामुळे देशात पेट्रोल २० ते २२ रुपयांना मिळायला हवे, असे असतानाही आताही ६० रुपयाच्या आसपास प्रति लीटर पेट्रोलसाठी द्यावे लागते. हेच काय सरकारचे अच्छे दिन, असा सवाल पटेल यांनी विचारला.
अजूनही महागाई वाढलेलीच आहे. गरीब व सामान्य माणसाच्या अनेक लोकोपयोगी योजना बंद पडलेल्या आहेत. शासनाच्या केवळ घोषणा, असे सारे घोषणापर्व चाललेले आहे. सोशल माध्यमाच्या वापर करून याच लोकांनी युपीए सरकारला बदनाम केले होते. आता त्यांचे सरकार काय दिवे लावत आहे हे जनतेला सांगण्याची जबाबदारी आपली आहे. ती आपण प्रामाणिकपे पाडल्यास २०१६ हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचेचे असेल, पटेल म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, गोंदिया येथे होणाèया मेडिकल कॉलेजसाठी परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रीडा संकुलाला राजाभोज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारकडे पाठविला आहे. येत्या १० फेबु्रवारी ला गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठिकाणी राजाभोज यांच्या नावाचा व मेडिकल कॉलेज होणाèया १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या नावाचा फलक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने लावण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसामान्यांचा पक्ष असून केलेल्या घोषणा पूर्ण करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संगठन मजबूत करण्याचे आवाहन आ. जैन यांनी केले.
यावेळी मंचावर माजी आ. दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, दामोदर अग्रवाल, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, मनोहर चंद्रीकापुरे, महेश जैन, रमेश ताराम, डॉ. अविनाश काशिवार, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, किशोर तरोणे, बबलू कटरे, शिव शर्मा, अजय गौर, उषा qकदरले, रिता लांजेवार, आशा पाटील, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, हिरालाल चव्हाण, केवल बघेले, नामदेव डोंगरवार, प्रभाकर दोनोडे, कमल बहेकार, मनोहर वालदे, किशोर पारधी, राजकुमारी विश्वकर्मा उपस्थित होते.