रस्ता सुरक्षेबाबत पथनाट्यातून जनजागृती

0
5

गोंदिया,दि.२० : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत (दि.१६) परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या वतीने रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रस्ता सुरक्षाविषयी आयोजित रॅलीमध्ये बाजपेयी मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या संचालिका लता बाजपेयी, आधार महिला संघटना, महिला शक्ती संघटना, वामा महिला संघटना, लायंस क्लब, महिला पतंजली संघटना, मातृशक्ती संघटनेतील महिलांचा सहभाग होता. तसेच नूतन विद्यालय, राजीव गांधी समाजकार्य विद्यालय, एन.एम.डी. महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचाही रॅलीमध्ये समावेश होता.
सिमा बैतुले व पुजा तिवारी यांनी जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा चौक, नेहरु चौक येथे पथनाट्य सादर केले. पथनाट्यामध्ये अपघाताबाबतचे दृश्य, देखावा, अपघाताचे परिणाम या विषयावर विद्यार्थीनींनी सादरकरण केले. कार्यक्रमात प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर.निमजे, वाहतुक निरीक्षक के.एम.धुमाळ, यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सदगीर, प्रभाकर पेन्सिलवार, जे.के.गंगभोज, बंडू मोहाडे उपस्थित होते. विविध संघटनाच्या महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.