वाचनसंस्कृती बळकट करणारा उत्सव – जि.प.अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे

0
16

गडचिरोली : पुस्तकाशी मैत्री ही वर्तमानाशी मैत्री असून ग्रंथच आपले गुरु आहेत. वाचनाची कमी होत चाललेली संस्कृती पाहता वाचन संस्कृती बळकट करणारा हा ग्रंथोत्सव असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी केले.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कवीवर्य मंगेश पाडगावकर नगरी’, शिवाजी महाविद्यालयाचे प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अश्विनी धात्रक, प्राचार्य डॉ.राजन जैसवाल, प्राचार्य डॉ.एन.एस.पठान, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, सहाय्यक परिवहन अधिकारी शांताराम फासे, शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी निकम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी विभा डांगे आदी उपस्थित होते. 
विद्यार्थ्यांनी विविध वेषभुषेत संत दर्शन, भारत दर्शन, अंधश्रध्दा निर्मुलन, साक्षरता, लेझीम पथक, भजन पथक, थोर पुरुषांच्या वेशभुषा इत्यादी झाकी सादर करुन समाजाला संदेश दिला. उद्घाटन समारंभाचे संचलन विद्या आसमवार व श्री. नंदकिशोर मांडवे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती विभा डांगे यांनी मानले.