नगराध्यक्षांचे स्वागत नाही;उदघाटनाकडे उदघाटकासंह राज्यमंत्री व खासदार आमदारांनी फिरवली पाठ

0
11

गोंदिया, दि.२३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त वतीने २२ आणि २३ जानेवारी रोजी गोंदिया येथील स्वागत लॉन येथे देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन आज पार पडले.परंतु या उदघाटन सोहळ्याकडे निमqत्रत असलेले उदघाटक छत्तीसगडे मुख्यमंत्री डॉ.रमणqसह यांनी एक दिवसाआधीच आपला दौरा रद्द केल्याने त्यांच्या जागी छत्तीसगढचे राजस्व व उच्चशिक्षणमंत्री प्रेमप्रकाश पांडे यांना निमंत्रित करण्यात आले होते.परंतु त्यांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरवली.

स्वागत समारंभ सुरू असताना व्यासपिठावरील पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शहराचे प्रथम नागरिक असलेले कशिश जायस्वाल देखील व्यासपिठावर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छाने झाले. परंतु, प्रथम नागरिकांचे स्वागत करण्यास आयोजक विसरले. त्यामुळे या कार्यक्रमातील नियोजनशुन्यता प्रकर्षाने उपस्थितांच्या डोळ्यात खुपसली.

सोबत ज्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयातंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या मंत्रालयाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही गैरहजेरी होती.तर गोंदिया जिल्ह्यातील एकाही आमदार व खासदाराने याकडे ढुंकुनही बघितले नाही.त्यामुळे जनतेत आयोजनसदंर्भात उलटसुलट चर्चाचा सुर होता.सर्वाधिक भाजपचे आमदार व खासदार असताना त्यांनीही का हजेरी टाळली चर्चेचा विषय झालेला आहे. उदघाटन सोहळ्याला नियोजित उदघाटक न आल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव उज्वल उके यांना उदघाटकाची भूमिका पार पाडावी लागली.उदघाटन सोहळ्याला गैरहजर राहिलेल्यामध्ये खा. प्रफुल पटेल, खा. नाना पटोले, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, नागो गाणार, राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम यांचा समावेश होता.