युवकच घडवू शकतात व्यसनमुक्त समाज;परिसवांदातील सुर

0
36

गोंदिया, दि.२३-चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य समेलनांच्या युवकामधील वाढते व्यसनाचे प्रकार ,आव्हाने व उपचार या विषयावर आयोजित परिसवांदातील सहभागी वक्त्यांच्या सुरातून व्यसनमुक्त समाज घडवायचे असेल तर तो आजचा युवक,युवती आणि शाळकरी मुलेच घडवू शकतात असा निघाला.या परिसवांदात दीपक पाटील,अमोल मडामे,डॉ.सुधीर भावे,डॉ.शैलेंद्र पानगावकर,तुलसीदास भोईटे सहभागी झाले होते.
परिसवादामध्ये तबांखुमुळे सर्वाधिक युवक वर्ग व्यसनाच्या आहारी चालल्याचे चित्र शहरातच नव्हे तर आता ग्रामीण भागातही दिसत आहे.तंबाखु आणि आकर्षक पॅकेqजक करुन युवकांना त्याकडे ओढणाèया कंपन्या या गावागावात पोचल्याने व्यसनधिनतचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे या कंपन्यावरच खर तर बंदी गरजेची आहे.सलाम बॉम्बे फाऊंडेशनने तंबाखुमुक्त शाळा,महाविद्यालयच नव्हे तर गाव ही मोहीम हाती घेतली असून राज्यातील चंद्रपूर येथील थुटरा हे गाव तंबाखुमुक्त झाल्याचे दिपक पाटील यांनी चर्चेत सांगितले.डॉ.सुधीर भावे व डॉ.शैलेंद्र पानगावकर यांनी सांगितले की यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्यांच्या कारणमिमांसेचा शोध घेत असताना व्यसनधिनता ही आत्महत्येला कारणीभूत असल्याचे आढळून आले.यवतमाळ जिल्ह्यातील निवडक ४ गावांचा जेव्हा सर्वे करण्यात आले त्यावेळी असे लक्षात आले की पीकपाणी व्यवस्थित होत नसल्याने आणि सावकाराकडून घेतलेले कर्ज वेळेवर देऊ शकत नसल्याच्या कारणाने तणावग्रस्त झालेला शेतकरी हा तंबाखुसारख्या व्यसनाकडू नैराशाच्या माध्यमातून वळला गेला.आणि या नैराश्याच्या माध्यमातून तंबाखु व दारुच्या आहारी गेलेला शेतकरी शेवटी त्रस्त होऊन आत्महत्या करु लागला ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उमेद सारखा पायलट प्रोजेक्ट हाती धरुन कर्जाच्या तणावात असलल्याचा शोध घेऊन त्यांना मृत्युनंतर १ लाखाची मदत करण्यापेक्षा जिवंत पणीच दहा हजाराची काही मदत करुन त्यांच्या समस्यांचे निवारण करता येईल काय हा प्रयत्न आम्ही शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सुरु केलेला आहे.सोबतच प्रत्येक गोष्टीत तारतम्य ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगितले.तर भोईटे यांनी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्वांनीच व प्रशासकीय यत्रणेची सुध्दा युवकांना या व्यसनापासून दूर राखण्याची जबाबदारी असल्याची विचार मांडले.