विदर्भ विकासासाठी पर्यटनाला चालणा देणार-ना.गडकरी

0
5

गोंदिया जिल्ह्यात ४ हजार कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन
गोंदिया,दि.२३-गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत राहिलेल्या पक्षाने विदर्भावर अन्याय केल्याने विकास खुटंला गेला.परंतु आता विदर्भ विकासाला प्राधान्य आपण दिले आहे.पुर्व विदर्भात महाराष्ट्राच्या ७५ टक्के जंगल असल्याने या भागाच्या विकासासाठी पर्यटनाला चालणा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतुक,परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.ते गोंदिया येथे आयोजित जिल्ह्यातील ४ हजार कोटीच्या ६ आरओबी आणि नव्या राष्ट्रीय महामार्गासह चौपदरीकरण रस्ते कार्यक्रमाच्या भूमिपूजनप्रसंगी आज बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले,जि.प.अध्यक्षा उषा मेंढे,आमदार गोपालदास अग्रवाल,विजय रहागंडाले,संजय पुराम,नगराध्यक्ष कशीश जायस्वाल,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार खोमेश रहागंडाले,भैरqसह नागपूरे,केशवराव मानकर,हरिष मोरे,भजनदास वैद्य,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,विनोद अग्रवाल,राध्येशाम अग्रवाल,सीता रहागंडाले,अशोक इंगळे,राकेश शर्मा,सभापती छाया दसरे,विरेंद्र अंजनकर,संतोष चव्हाण,येशुलाल उपराडे,दिलीप चौधरी,डॉ.लक्ष्मण भगत,प्रमोद संगीडवार,सभापती देवराम वडगाये यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.ना.गडकरी पुढे म्हणाले की गोंदिया भंडारा जिल्ह्यातील निसर्गसंपदेचा लाभ पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन पर्यटन रोजगाराच्यासंधी निर्माण केल्या जातील.सोबतच शेतकरी विकासासाठी सरकारने नवी पिक विमा योजना काढली आहे,तीचा लाभ घ्यावा.आणि ज्याप्रमाणे आपण भाताचे उत्पादन घेत होतो त्याचप्रमाणे गेल्या अनेकवर्षापासून असलेली लाखोळीवरील बंदी केंद्रसरकारने हटविण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.सोबतच भारतात पहिल्यांदा धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि बायोप्लास्टिक तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.यामुळे तणसाला मागणी येऊन शेतकèयाला भाव मिळणार आहे.याकरीता शेतकèयांनो घाबरुन न जाता भविष्यात मात्र नगदी आणि अधिक उत्पन्न देणारे पीक लावण्याकडे वळा सरकार पाठीशी असल्याचे म्हणाले.यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही जिल्ह्याच्या विकासात या कार्यक्रमामुळे मोठी संधी निर्माण झाली असून मागासलेपणाचा ठपका असलेला जिल्हा हा विकासाच्या प्रवाहात येऊ लागला आहे.खासदार नाना पटोेले यानी गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी टुरीझमसुविधा आणि शेतीवर आधारीत उद्योगाची गरज असून एमआयडीसीमधील जागा ज्यांनी आपल्या ताब्यात घेतली परंतु उद्योग स्थापन केला नाही ती परत घेऊन बेरोजगारांना देण्यात यावे असे म्हणाले.जिल्ह्याचा राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याचे काम आज झाले असून कुठलीही निवडणुक लक्षात न घेता विकासासाठी ४ हजार कोटीचे रस्ते आणि पुल जिल्ह्यात फक्त २० महिन्याच्या आत सरकारने मंजुर करुन गोंदियाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यात येत असल्याचे सांगत आम्ही विकासाच्या मानसिकतेत आहोत कुणाच्या खोट्या विरोधाकडे जाऊ नका असे म्हणाले.यावेळी स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विकासासाठी गडकरींचे अभिनंदन करीत गोंदियाच्या मरारटोली उडणपुलासोबतच नव्याने तयार होणाèया चौपदरीकरण हायवेला पश्चिम बायपासशी जोडण्याची मागणी करीत विकासासाठी सोबत असल्याचे सांगितले.गडकरींचे भारतीय जनता पक्षाच्यावतीने शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्तविक भाजपजिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले,संचालन दिपक कदम यांनी तर आभार संजय कुलकर्णी यांनी मानले.