ख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – सुधीर मुनगंटीवार

0
11

चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात 30 हजार किलो मिटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी 74 किलो मिटर तर पुढील वर्षी 192 किलोमिटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येणार असून या योजनेतील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे शनिवारी घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.