हरणाचा अज्ञात वाहनाच्या ध़डकेत मृत्यू ,निलघोडा विहिरीत

0
31
गोंदिया,दि.26-गोरेगाव वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या ध़डकेत मुरदोली गावाजवळील राज्य मार्गावर  सोमवारला मृत्यू झाला.तर दुसर्या घटनेत याच वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणार्या सलंगटोला गावात पाण्याच्या शोधात भटकत आलेला नीला घोडा  ललित भगत यांच्या विहरीत पडल्याची घटना घडली.या दोन्ही घटना नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर परिसराला लागून घडल्या आहेत.विहीरीत नीलघोडा पडल्याची माहिती ललीत भगत यांना कळताच त्यांनी गोरेगाव वनविभागाला कळविले.सुदैवाणे विहिरीत जास्त पाणी नसल्याने या नील घोड्याला गावकर्यांच्या मदतीने वन विभागच्या अधिकार्यांनी बाहेर काढून प्राण वाचविले. नील घोड्यावर प्राथमिक उपचार करून नागझिरा जंगलात सोडण्यात आले. मुरदोली गावातील राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या ध़डकेत हरणाचा रात्रीच्यावेळी मृत्यु झाला असावा असे वन्यप्रेमींचे म्हणने आहे.