चंद्रपूर जिल्हा विकासात राज्यात अव्वल करण्याचा संकल्प — ना.सुधीर मुनगंटीवार

0
8

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर,दि.26- जिल्हयात विकासाच्या विविध योजनांनी वेग घेतला असून चंद्रपूर जिल्हा विकासात राज्यात अव्वल करण्याचा संकल्प चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. जिल्हावासियांना उद्देशून केलेल्या भाषणात ना.मुनगंटीवार यांनी विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी परेडचे निरीक्षण केले.

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, जि.प.उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने व स्वतंत्र संग्राम सैनिक तसेच अधिकारी उपस्थित होते.

नवचेतना मिशन हा राज्यातील पहिला नाविण्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर जिल्हा परिषदेत राबविला जात आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणारा आहे. जिल्हयातील एक हजार अंगणवाडया डिजिटल करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर या जिल्‍हयांमधील माजी मालगुजारी तलावांच्‍या दुरूस्‍तीसाठी असलेला हेक्‍टरी 28 हजार रू. निधी अपुरा पडत असल्‍यामुळे ही खर्च मर्यादा वाढविणे गरजेचे झाले होते. ही मर्यादा 50 हजार रू. केल्‍यामुळे माजी मालगुजारी तलावांची दुरूस्‍तीची कामे, विशेषतः गाळ काढणे यावर भर देण्‍यात येणार असुन त्‍यामुळे माजी मालगुजारी तलावांची साठवण क्षमता वाढवून त्‍याचा लाभ शेतक-यांना होणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळयात पालकमंत्री यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी व नाटय कलावंताचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.