भरपावसात निघाला अंगणवाडी सेविकांचा जि.प.वर मोर्चा

0
104

गोंदिया,दि.04ः- महाराष्ट्र राज्य आंगणवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने आज 4 जुलैरोजी भर पावसात विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यासोबतच 21 हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे.वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावे.सेवानिवृत्त सेविका व सहाय्यिकांना एकरक्कमी थकीत रक्कम देण्यात यावे.पोषण आहार ट्रक मराठी भाषेत करुन नवे मोबाईल देण्यात यावे आदी मागण्यासांठी हा मोर्चा आयटकचे प्रदेश उपाध्यक्ष हौसलाल रहागंडाले,अंगणवाडी सेविका संघटन जिल्हाध्यक्ष शंकुतला फटिंग,आम्रकला डोंगरे,जिवनकला वैद्य,पौर्णिमा चुटे,विठाबाई पवार,बिरजूला तिडके व कांचन लाडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.मोर्चा जिल्हापरिषदेसमोर पोचल्यानंतर महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर तसेच उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे असलेले निवेदन सादर करण्यात आले.निवेदन देतेवेळी  सुनिता मंलगाम,मिनाक्षी पटले,राजलक्ष्मी हरिनखेडे, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, देवगंणा अंबुले, अर्चना मेश्राम, प्रणिता रंगारी उपस्थित होते.