राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा

0
14

 गोंदिया,दि.13 : आजची बालके उद्याची भविष्य आहेत. हे उद्याचे भविष्य यांचे आरोग्य सुदृढ असावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन 2013-14 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सन 2013 पासून जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आंगणवाडी केंद्र व शासकीय व निमशासकीय शाळा तसेच आश्रम शाळेमधील 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची या योजनेअंतर्गत कार्यरत 20 वैद्यकीय पथकामार्फत नियमीत आरोग्य तपासणी करण्यात येते. किरकोळ आजारी लाभार्थ्यांना सदर ठिकाणीच औषधोपचार करण्यात येते. गंभीर आजार आढळणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील तपासणीकरीता वेळोवेळी संदर्भसेवा शिबिराचे आयोजन जसे- 2-D-ECHO Camp, Bera test इत्यादी चाचण्या करण्यात येतात व काही लाभार्थ्यांना DEIC मध्ये संदर्भीत करण्यात येते. तपासणी दरम्यान आढळलेल्या लाभार्थ्यांना शस्त्रक्रियाकरीता राज्य स्तरावरुन सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयात संदर्भीत करुन आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात येतात.

          राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 मध्ये माहे एप्रिल ते जून 2022 पर्यंत 19 बालकांची हृदय शस्त्रक्रिया व 86 बालकांची इतर (कर्णदोष रुग्णांवर 3 कॉक्लेअर इम्प्राप्लांट शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्ह्यातील कार्यरत पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सहकार्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येते. तरी जिल्हा शल्यचिकित्सक गोंदिया यांचेकडून आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा.