गराडा येथील तलाठी नागदेवे निलंबीत

0
22
 
तिरोडा ,दि.6:  तालुक्यातील तलाठी साझा क्र.१२ गराडा येथे कार्यरत असलेले तलाठी नागदेवे यांचेवर तिरोडा तहसीलदारांनी निलंबनाची कारवाई केली आहे. घोगरा येथे कार्यरत असलेले तलाठी आनंद प्रभाकर भुते हे २८ जानेवारीला नागदेवे यांच्या कार्यालयात शासकीय कामाकरीता व त्यांच्या मार्गदर्शनाकरीता गेले असता कार्यालयीन वेळेत ३ रेतीमाफीयांनी नागदेवे यांच्यासमक्ष तलाठी भुते यांना धमकावून मारपीट केली. दरम्यान भुते यांनी वसुल केलेल्या दंडाची रक्कम मागून  सहकार नगर तिरोडा येथील भुते यांचे राहते घरी नेवून तस्करांनी शिवीगाळ केली. शासकीय दस्ताऐवजांची नासधुस करून दंडाची रक्कम पकडून नागदेवे यांच्या समक्ष फरार झालेत. घटनेची माहिती वेळीच वरिष्ठांना दूरध्वनी अथवा इतर संदेशाद्वारे अवगत करणे हे त्यांचे कर्तव्य असताना घटनेची माहिती वरिष्ठांपासून लपवून ठेवणे, वसुलीची रक्कम रेती माफीयांना परत करण्याचा सल्ला तलाठी भुते यांना देणे व रेतीमाफीयांना मदत करणे इत्यादी बाबी करून शासकीय कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत तिरोडा येथील तहसीलदारांनी  महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नियम ४ (१) मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतून तत्काळ प्रभावाने निलंबीत केले आहे.निलंबन कारवाईची प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली.