जागतिक पक्षी पानथळ अधिवास दिवस साजरा

0
23

गोंदिया,दि.८ : २ फेब्रुवारी हा जागतिक पक्षी पानथळ अधिवास दिवस परसवाडा येथे साजरा करण्यात आला. परसवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना परसवाडा येथील तलावावर पक्षांबाबत तसेच त्यांच्या अधिवासाबाबत माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम व मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिवसेंदिवस पक्षी अधिवास कमी होत आहे तसेच त्यांचा दर्जासुध्दा खालावत आहे. पाणथळ अधिवास पक्षांकरीता मासोळ्या व जैवविविधता किती आवश्यक आहे हे पटवून दिले. जैवविविधता किती आवश्यक आहे पटवून दिले. जैवविविधतेने नटलेला व तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्हयात कमी व निकृष्ट होत चाललेल्या पक्षी पाणथळ अधिवासाकरीता उपाययोजना करण्याची आवश्यकता विशद करुन यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगितले.
परसवाडा येथे जैवविविधता पुनरुज्जीवन व संवर्धनाचे कार्य गेल्या ३ वर्षापासून वनविभागाच्या वतीने लोकसहभागातून करण्यात येत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे परसवाडा तलाव आणि तेथील जैवविविधता समिती होय. जैवविविधतेकरीता उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल समिती अध्यक्ष सलीम शेख, राहूल भावे व रतिराम क्षीरसागर यांना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी जास्त पक्षांच्या नावांची जैवविविधतेबाबत माहिती दिली त्यांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच डेलेंद्रकुमार हरीणखेडे, उपसरपंच गोविंद उके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुन्नालाल पारधी, सलीम शेख, दिनेश हरीणखेडे, मुख्याध्यापक आर.पी.वाघमारे, शिक्षक जी.टी.रहांगडाले, सी.जे.बन्सोडे तसेच ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.