वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्ररथाचे राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन

0
13

नागपूर : राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्यावतीने विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे आयोजन केले. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, आमदार प्रकाश गजभिये, माहिती संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे उपस्थित होते.

राज्य शासनाच्या एक वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती असलेला चित्ररथ हा नागपूर विभागात, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात माहिती देणार असून या चित्ररथाद्वारे राज्य शासनाच्या अटल सौर कृषी पंप योजना, सिंचनाला कृषी पंपाची जोड, शेतकऱ्यांना सावकारी कर्ज माफीचा दिलासा, लोकसेवा हमी कायदा, जलयुक्त शिवार योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत येणारी पारदर्शकता संकल्प जलसत्ताक होण्याचा लोकाभिमुख गतिमान पारदर्शक महाराजस्व अभियान, लोककल्याणासाठी, दुष्काळग्रस्तांसाठी 10 हजार 512 कोटींचे विशेष पॅकेज अशा अनेक योजनांची माहिती या चित्ररथद्वारे देण्यात येणार आहे.