मग्रारोहयोतंर्गत खाडीपारात तलाव दुरुस्ती कामाचे भूमिपूजन

0
10

गोरेगाव,दि.२०-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग गोंदियाच्यावतीने तलाव दुरुस्ती कामाला सुरवात करण्यात आली.या कामाचे भूमिपूजन तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते आज शनिवारला करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेंद्र बिसेन ,उपविभागीय अभियंता आ़र.आर.चौधरी,शाखा अभियंता पी.डी.रहागंडाले,जिल्हा परिषद सदस्य ललीता चौरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.या तलावाची क्षमता सध्याच्या घडीला १० हेक्टर असून या दुरुस्तीच्या कामानंतर २४ हेक्टरने qसचन क्षमेतत वाढ होऊन ३४ हेक्टर क्षेत्राला qसचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता चौधरी यांनी दिली.