नक्षल्यांनी अडविला भामरागड-आलापल्ली रस्ता

0
10

गडचिरोली, दि.२०: भामरागड तालुक्यात नक्षल्यांनी आज ताडगावनजीकच्या बांडिया नदीच्या पुलाजवळ रस्त्यावर दगड आडवे टाकून रस्ता अडविल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

ताडगावच्या अलिकडे बांडिया नदी असून, शेजारीच बांडियानगर वसलेले आहे. या वस्तीशेजारच्या मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी लाल बॅनर बांधले होते. शिवाय रस्त्यावर दगड आडवे टाकून शेजारी काही पत्रकेही टाकली होती. यामुळे सकाळी बराच वेळपर्यंत आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.