‘विराआंस’ने केली नागपूर कराराची होळी

0
15

चंद्रपूर-२८ सप्टेंबर १९५३ रोजी महाराष्ट्रातील नेत्यांनी नागपूर करार करून १ मे १९६0 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन करून त्यात विदर्भाला जबरदस्तीने सामिल करून महाराष्ट्राने विदर्भाला कायमची वसाहत केले आहे. या नागपूर करारामुळेच विदर्भाची खरी फसवणूक झाली आहे. या नागपूर कराराचा निषेध करीत बुधवार, २८ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती, गोंडपिपरी, गडचांदूर, जिवती या ठिकाणी जोरदार घोषणा देत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर कराराची होळी केली.
चंद्रपूर येथे जेटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, नथमल सोनी, अंकुश वाघमारे, आदिनाथ उके, ईश्‍वर चहारे, मुरेकर, पुंडलिक गोठे, अनिल दिकोंडवार, माकोडे, रवींद्र तीराणिक, चांदेकर इत्यादींनी केले. राजुरा येथील संविधान चौक येथे नागपूर कराराची होळी करण्यात आली. या आंदोलनात ज्येष्ठ नेते अँड. मुरलीधर देवाळकर, विदर्भ युवा आघाडी पूर्व विदर्भ अध्यक्ष कपिल इद्दे, दिनकर डोहे, शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, विनोद बारशिंगे, रमेश नळे, मधुकर चिंचोळकर, उत्पल गोरे, वैभव अडवे, सारंग रामगिरवार, गजानन पहानपटे, बळीराम खुजे, भाऊजी कंनाके, बंडू कोडापे, विठ्ठल पाल, मनोज गोरे ,विलास कोदिरपाल यांच्यासह आंदोलन समितीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. येथे नागपूर कराराची होळी केली.
कोरपना येथे अरुण नवले, रमाकांत मालेकर, अँड. श्रीनिवास मुसळे, पद्माकर मोहितकर, अविनाश मुसळे, बंडू राजुरकर, संजय येरमे, सत्यवान आत्राम यांचे नेतृत्वात नागपूर कराराच्या प्रती जाळून आंदोलन करण्यात आले. गोंडपिपरी येथे अरुण वासलवार, नीळकंठ गौरकार, अँड. सुर, अँड. प्रफुल्ल आस्वले, रवींद्र हेपट, आनंद खर्डीकर,भारत खामनकर यांचेसह अनेकांनी नेतृत्व केले. भद्रावती येथे सुधीर सातपुते, सचिन सरपटवार, राजू बोरकर यांच्या नेतृत्वात कराराची होळी करून निषेध करण्यात आला. गडचांदूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागपूर कराराच्या प्रती जाळून निषेध करण्यात आला.
गडचांदूर येथील आंदोलनाचे नेतृत्व जि. प. माजी सभापती नीळकंठ कोरांगे, संतोष पटकोटवार, प्रवीण गुंडावार, माजी पं. स. सभापती रवींद्र गोखरे, माजी उपसभापती मदन सातपुते, रमेश चांदेकर, गौरकार गुरुजी यांनी केले. जिवती शहरातील मुख्य चौकात नागपुर कराराची होळी करून आंदोलन करण्यात आले. येथे सुदाम राठोड, विनोद पवार, शब्बीर जागिरदार यांनी नेतृत्व केले. येथे नागरिक मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले.
सर्वच ठिकाणी आंदोलकांनी जल गया भाई जल गया, नागपूर करार जल गया, लढेंगे, जीतेंगे, लाठी खाऊ गोळी खावू, विदर्भ राज्य मिळवून घेऊ या घोषणांनी गावे दणाणून गेला होता.