रवींद्र हेमने यांचे दुःखद निधन

0
47

गोंदिया(ता.30)- तालुक्यातील नवरगाव कला येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच रवींद्र सुदामजी हेमने यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (ता.29 ) दुपारी दुःखद निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. परिसरात एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.