विजयादशमी निमित्त वांढरा येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

0
22

देवरी,दि.02-  देवरी तालुक्यातील वांढरा (चिचगड) येथे विजयादशमीच्या निमित्ताने येत्या गुरूवारी (दि. 6) एका भव्य भजन स्पर्धेचे आयोजन वांढराच्या श्रीराम प्रासादिक आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान हे राहणार आहेत. स्पर्धेचे उद्धाटन गोंदिया जि.प.चे सदस्य उषा शहारे यांचे हस्ते होईल.  सहउद्घाटक म्हणून जिप सदस्य राधिका धरमगुळे, उपाध्यक्ष म्हणून इंदल अरकरा, नीता कुंजाम, मीरा कुंजाम, रंजीत कासम, मोतीलाल पिहिदे, उमेश बागडेहरिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार स्वरूपात 10 हजार रोख सरपंच मीरा कुंजाम यांचे कडून, द्वितिय पुरस्कार 7 हजार रोख मोतीलाल पिहिदे, तृतीय पुरस्कार 5 हजार उमेश बागडेहरिया, तृतीय पुरस्कार महिलांसाठी 5 हजार सुरेश ताराम, चवथे पुरस्कार 3 हजार रोख राजकुमार राऊत, चवथे पुरस्कार महिलांसाठी 3 हजार रोख अशोक शहारे यांचे कडून आणि महिलांसाठी 2 हजार 100 रोख अशोक धरमगुळे यांचे कडून दिले जाणार आहेत. या व्यतिरिक्त उत्कृठ तबला वादकाला  दुर्योधन भोगारे यांचे कडून, हार्मोनिअम वादक यास जितेंद्र कुंजाम यांचे कडून, उत्कृष्ठ गायक यांस विनोद गावळ यांचे कडून तर महिला गायक यांना  प्रेमलाल राऊत यांचेकडून प्रत्येकी 500 रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार आहेत.

तरी इच्छूक भजनी मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.