जि.प.उपाध्यक्षांच्या अकस्मात भेटीत घोनाडी आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार उघडकीस

0
118

चिचगड,दि.०२ःजिल्ह्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला आज रविवारला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य सभापती इंजि.यशवंत गणवीर यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीत केंद्रातील अनागोंदी कारभार उघडकीस आला. जि.प.आरोग्य सभापतींच्या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे बघावयास मिळाले.विशेष म्हणजे आरोग्य केंद्र व औषधभांडार कक्षाचे दार खुले करुन सर्व कर्मचारी बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले.उपाध्यक्ष व आरोग्य सभापती केंद्रात आल्याचे कळताच काही वेळानंतर एल.एच.व्ही. कु.सहाळा,वाहन चालक बोपचे पोचले.त्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.औषध भांडारातून एखाद्या व्यक्तीने कुठलीही औषध नेऊन सेवन केल्याने कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत संबधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना उपाध्यक्ष इंजि.गणवीर यांनी त्वरीत भ्रमणध्वनी करून दिले.