आ.रहांगडाले यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

0
26

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून मौजा सावरा येथे जनसुविधा अंतर्गत ग्रामपचायत इमारत बांधकामाकरिता सन २०२०-२१ मध्ये १२.०० मंजूर झाले असून सदर वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले असून आमदार महोदयांच्या हस्ते लोकार्पण नुकतेच संपन्न झाले तसेच आमदार स्थानिक विकास निधी अतंर्गत मौजा अर्जुनी येथे महात्मा फुले चौकात ५.०० लक्ष रुपये सभामंडप बांधकामाकरिता मंजूर असून सदर कामाचे भूमिपूजनसुद्धा संपन्न झाले भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने कृबास माजी सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन,प.स.उपसभापती हुपराज जमाईवार,प.स.सदस्य डॉ.चेतलाल भगत,सावर सरपंच सौ.वंदना राणे,उपसरपंच गिरधारी बानेवर,अर्जुनी सरपंच समीक बन्सोड,उपसरपंच राजेश चव्हाण मा.सरपंच प्रीतम रहांगडाले, महेंद्र बागडे, यशवंत भगत, दुलीचंद पटले, पवन तुरकर, रमेश कोल्हे, रुपलाल अंबुले, नरेश बागडे,मधुकर तिडके, अरुण मिश्रा, गोपीचंद उपरीकर,योगेश्वर सुर्यवंशी,रज्ज्त धुर्वे व कार्यकर्ते उपस्थित होते.