गोंदिया स्थानकाच्या विकासासाठी मध्य रेल्वेला जोडा

0
10

गोंदिया,दि.२४-गोंदिया हे रेल्वेस्थानक दक्षिण मध्य पूर्व रेल्वेचे सर्वाधिक उत्पन्न देणारे बिलासपूर झोनमधील स्थानक आहे.परंतु अद्यापही या स्थानकावर हव्या त्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत.विशेष म्हणजे हे स्थानक बिलासपूर झोनमधील उपेक्षित स्थानकात मोठे ठरले आहे.छत्तीसगड मध्ये बसलेल्या अधिकाèयांनी रायपूर,दुर्ग स्थानकासारख्या सुविधा देण्याची भूमिका कधीच न घेतल्याने आजही या स्थानकावरून सुटू शकणाèया गाड्या आणि थांबा मिळालेले नाही.त्यातच वाढती प्र‹वाशी संख्या आणि गाड्यांची संख्या बघूनही प्लेटफॉमची लांबी आणि संख्या वाढविण्याकडेही दुर्लक्ष केल्याने अनेकदा चंद्रपूर व बालाघाट मार्गावरील गाड्या अर्धा ते पाऊणतासपर्यंत आऊटवर थांबवल्या जातात.त्यातच मालधक्का अद्यापही स्थानातंरीत न केल्याने वाहतुकीची कोंडी प्रवाशांना अडचणीची ठरली आहे.तर प्लेटफार्म क्रमांक १ वरून वर्ष लोटले तरी नागपूरला मार्गावर जाणाèया गाड्यांसाठी qलकीगची व्यवस्था करण्यात न आल्याने होम प्लेट फार्म आजकल फक्त लोकल गाड्यासाठीच ठरला आहे.सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक असले तरी पुरी एक्सप्रेस ,दुरोंताला थांबा नाही.तर तिरोड्यात अनेक दिवसापासून मागणी असून विदर्भला थांबा दिला जात नाही.गेल्या २० वर्षात बिलासपूर झोनच्यावतीने गोंदिया स्थानकाचा पाहिजे तसा विकास केलेला नाही.या मार्गावर गोंदिया ते इतवारी दरम्यान तिसèया रेल्वेलाईनचे काम न करता आधी दुर्ग ते रायगढ असे करून बिलासपूर झोनच्या अधिकाèयानी आपले छत्तीसगड प्रेम दाखविले आहे. गेल्या एक वर्षापासून लिफ्टचे काम सुरू करण्यात आले.ते खड्डे खोदूनच बंद पडले आहे.स्वयचलित सिढी सु्दा अद्यापपयर्त लगेलेल नाही.
गोंदिया तील अनेक रेल्वे प्रवासी संघटनानी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानक बिलासपूर झोन मधून काढून मुंबई मध्यरेल्वेला जोडण्याची मागणी केलेली आहे.कारण गोंदिया स्थानक हे बिलासपूर झोन मध्ये येत असले तरी या झोनतर्गंत बरोनी एक्सप्रेस वगळता विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन्ही मध्यरेल्वेच्या गाड्या गोंदिया स्थानकातून सुटतात.किंवा नागपूरला झोनचा दर्जा देऊन त्यात सहभागी करण्यात यावे.