चौकशी अहवालात ग्रामसेवक दोषी: १७.७१ लाखांच्या भ्रष्टाचार

0
15

सडक अर्जुनी :जवळील ग्राम वडेगाव येथील ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या विविध फंडातील निधीची अफाराफतर केल्याची तक्रार काही ग्रामपंचायत सदस्य आणि गावकर्‍यांनी केली होती. प्रकरणात तपासणी कागदपत्राच्या आधारे पंचायत समितीतर्फे चौकशी अहवाल देण्यात आला. त्या अहवालानुसार १७ लाख ७१ हजार ६५८ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा अंदाज दर्शविण्यात आला आहे.
२६ जानेवारी रोजी वडेगाव येथील ग्रामसभेला जमलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकर्‍यांनी ग्रामसेवकाच्या अनागोंदी कारभाराविषयी चर्चाकेली आणि ग्रामसेवकाला अगोदर हिशोब मागायचा आणि नंतरच ग्रामसभा घ्यायची असे ठरविण्यात आले. परंतु ग्रामसेवक एस.एस.सिरसाम यांनी ग्रामसभेत हिशोब सादर केला नाही. यावर ग्रामपंचायत सदस्य आणि गावकर्‍यांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आणि पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी टेंभरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली. सामान्य फंड, १३वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, बिआरजीएफ, तंटामुक्त निधी असे ग्रामपंचायतच्या पाचफंडातील सन २0१४-१५ व २0१५-१६ मध्ये १७ लाख ७१ हजार ६३८ रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार दिसून येत असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.