स्व.श्री के. के. इंगळे जयंती समारोह

0
9

गोंदिया- श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित श्रीराम विद्यालय, खमारी येथे  स्व. श्री के. के. इंगळे जयंती समारोह व मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी. डी. मार्कण्डेय व प्रमुख अतिथी म्हणू पर्यवेक्षक  व्ही. जे. रावते हे होते.
सर्वप्रथम  सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. नंतर मातृ-पितृ पूजनाचे महत्व श्री सक्सेना सर यांनी विद्याथ्र्यांना सांगितले व मातृ-पितृचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माजी सचिव स्व.श्री कमलाकरराव केशवराव इंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी. डी. मार्कण्डेय यांनी स्व.श्री कमलाकरराव केशवराव इंगळे यांच्या जीवनावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाÚयांनी प्रयत्न केले.