जिल्हा परिषद 53 कॉन्व्हेंट करणार सुरु-पी.जी.कटरे

0
13
गोंदिया ,दि.24: कॉन्व्हेंट संस्कृतीच्या वाढत्या वर्चस्वामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. या शाळांना संजीवनी देण्यासाठी गोंदिया  जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ५३ जि.प. शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या शैक्षणिक सत्रात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कॉन्व्हेंट सुरू करणारी गोंदिया जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार अशी माहिती आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी दिली.ते जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय अहवालावर माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्हा परिषद शाळा म्हणजे गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव अशी समजूत आहे. यामुळेच  जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ‘झोलबा पाटलाचा वाडा’ असे बोलले  जाते. जिल्हा परिषद शाळांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टrकोन हा नेहमीच नकारात्मक राहिल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या घसरू लागली आहे. परंतु अलीकडे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन-नवीन प्रयोग करून या शाळा टिकविण्याची धडपड केली जात आहे.
‘गावची शाळा आमची शाळा’ या उपक्रमानंतर सेमी इंग्रजी माध्यम, डिजीटल शाळा असे उपक्रम राबविले गेले. या उपक्रमात भर म्हणून आता कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते ७ पर्यंतच्या १ हजार ४९ प्राथमिक शाळा आहेत तर २२ माध्यमिक शाळा आहेत. मागील काही वर्षांपासून गोंदियासह संपूर्ण राज्यातीलच जिल्हा परिषद शाळांना घसरती कळा लागली आहे. याला कारण म्हणजे अलिकडे इंग्रजी शिक्षण आणि कॉन्व्हेंट संस्कृतीकडे पालक वर्गाचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापुर्ण शिक्षणाचा अभाव असल्याची समजूत तशी सर्वशृत झाली आहे. यामुळेच जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळा मागील काही वर्षांपासून विद्यार्थी संख्या रोडावल्याने ओस पडू लागल्या आहेत. या शाळांना संजीवनी देवून मराठी शिक्षणासह गरीब विद्याथ्र्यांनादेखील कान्व्हेंटरुपी इंग्रजी शिक्षण मिळावे व   जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून रहाव्यात या उद्देशाने गोंदिया जिल्हा परिषदेने  येत्या सत्रापासून प्रायोगीक तत्वावर ५३ जिल्हा परिषद क्षेत्रातील ५३ शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर  येत्या २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील ५३ जिल्हा परिषद क्षेत्रात संबंधीत जि.प.सदस्य एका गावाची निवड करणार आहेत. निवड झालेल्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच पुर्वीच्या १ ते ७ या वर्गाच्या शिक्षणाबरोबरच              केजी-१ आणि केजी-२ हे दोन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या नंतर दरवर्षीच्या नव्या सत्रात कॉन्व्हेंटच्या तुकड्या वाढविल्या जातील. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षकच त्या कॉन्व्हेंटच्या विद्याथ्र्यांना शिक्षण देणार आहेत. कॉन्व्हेंट संस्कृतीचे पॅâड अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने श्रीमंत पालकांपासून तर गरीब पालक सुद्धा आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत अर्थातच कॉन्व्हेंटमध्ये पाठवू लागले आहेत. ज्या गरीब विद्याथ्र्यांना खासगी कॉन्व्हेंटमध्ये पैशाअभावी शिक्षण मिळू शकत नाही अशा गरीब विद्याथ्र्यांचे कॉन्व्हेंट शिक्षणचे उद्दिष्ट पुर्ण व्हावे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिवूâन रहाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने जि.प. शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  यावेळी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, उपाध्यक्षा रचना गहाणे, कृषी सभापती छाया दसरे, समाजकल्याण सभापती विजय वडगाये उपस्थित होते.