बैलबंडी घोटाळ्याच्या अहवालाकडे नजरा

0
19

चंद्रपूर : जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. घोटाळ्याच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेली समिती आपला चौकशी अहवाल आठवडाभरात सादर करण्याची शक्यता असून या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत शेतकर्‍यांना अनुदानावर बैलबंडी वाटप करण्यात आले. मात्र अनेक बैलबंडी वजनाने हलक्या होत्या. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी अनुदानावर मिळालेल्या बैलबंडी भंगारात विकल्याचा प्रकार राजुरा तालुक्यात घडला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून वाटप करण्यात आलेल्या बैलबंडी कमी वजनाच्या असल्याच्या तक्रारी अनेक शेतकर्‍यांनी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांच्याकडे केल्या होत्या. जाधव यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. त्यानंतर अनेक सभांमध्ये बैलबंडी वाटपाचा मुद्दा गाजला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अधिकार्‍यांनी बैलबंड्याची तपासणी केली.