नाल्यात पडून हवालदाराचा मृत्यू

0
10

अहेरी, -: येथील पंचायत समितीनजीक असलेल्या नाल्यात एका पोलिस हवालदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. विठ्ठल कोलबा लेकामी(४७) असे मृत हवालदाराचे नाव असून, ते अहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

अहेरी पंचायत समितीजवळून एक नाला वाहतो. आज पहाटे या नाल्यात एक हिरोहोंडा मोटारसायकल व एक इसम पडून असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यानी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तपासादरम्यान तो इसम विठ्ठल लेकामी असल्याचे समजले. श्री.लेकामी हे वर्षभरापासून अहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते मूळचे गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा आहे.