अपर पोलिस अधीक्षकांची शस्त्रक्रियेसाठी मदत

0
26

गोरेगाव-कुर्हाडी येथील ७ व्या वर्गात शिकत असलेली डिम्पल अभ्यासात हुशार असली तरी, लिहिता वाचताना डोळ्याचा त्रास होत होता. त्यामुळे डोळे तपासणी केली असता त्यात ४0 टक्के दोष असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. डिम्पलच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शस्त्रक्रिया करता येत नव्हते. मुलीला डोळ्यांच्या त्रासामुळे नीट पाहता येत नाही, असी खंत आईवडिलांना होती. त्यातच त्यांनी दानदात्यांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची हाक मारली.
आईवडिलांची भेट घेऊन आर्थिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले. पोलिस निरीक्षक सचिन म्हत्रे यांनी याबाबतची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांना दिली. तेव्हा त्यांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे ठरविले. त्यांनी लगेच पोलिस निरीक्षक म्हत्रे यांच्यासोबत कुन्हाडी येथे जाऊन स्वत:कडून १0 हजार रुपयांची मदत दिली. अपर पोलिस अधीक्षकांच्या मदतीमुळे डिम्पलचे आई-वडील भारावून गेले. डिम्पलला पुढे शिकविणार असे आश्‍वासन देत त्यांनी पोलिस अधिकार्‍यांचे आभार डिम्पलबाबत माहिती कळताच पोलिस निरीक्षक सचिन म्हत्रे यांनी कुन्हाडी येथे जावून डिंपल व तिच्या आईवडिलांची भेट घेऊन ऊार्थिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले. पोलिस निरीक्षक सचिन म्हत्रे यांनी याबाबतची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांना दिली. तेव्हा त्यांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे ठरविले. त्यांनी लगेच पोलिस निरीक्षक म्हत्रे यांच्या सोबत कुर्हाडी येथे जाऊन स्वत:कडून १0 हजार रुपयांची मदत दिली. अपर पोलिस अधीक्षकांच्या मदतीमुळे डिंपलचे आई-वडील भारावून गेले. डिंपलला पुढे शिकविणार असे आश्‍वासन देत त्यांनी पोलिस अधिकार्‍यांचे आभार मानले. आता लवकरच मुलीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करणार असे त्यांनी बोलून दाखविले.