धादरी-उमरीवासियांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

0
9

तिरोडा : तिरोडा शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या धादरी-उमरी गावात गट ग्रामपंचायत कार्यालय धादरी येथे संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच ग्रामवासीयांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.

वनराई बंधारा

26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहसतवादी हल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिक व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर या दिनाचे औचित्य साधून धादरी-उमरी गावाच्या मधातून वाहत असलेल्या नाल्यावर गट ग्रामपंचायत, तालुका कृषी अधिकारी तिरोडा, पूर्व माध्यमिक शाळा धादरी, पूर्व प्राथमिक शाळा उमरी, श्रम शक्ती समिती व गावातील होतकरू जागृत तरुण मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे.

या सर्व उपक्रमांत सरपंच अजितकुमार ठवरे, कृषि सहायक रुपेश रिणाईत, ग्रामसेवक ढोके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष घनश्याम रहांगडाले, पोलीस पाटील उके, शाळा समितीचे अध्यक्ष रेखलाल पटले, सुनिल पटले सदस्य ग्रापं सदस्य अमिताभ चौरे, ग्रापं माया अनकर, पवन पटले, संतोष लिल्हारे, दिपक नागपुरे, डॉ.पटले, डॉ.रहांगडाले, सुखदास अनकर, प्रेमलाल पटले, झनकलाल पटले, मनोहर रहांगडाले, नंदलाल कटरे, संतोष भगत, प्रमोद उके, सतिश गणेश पटले, नरेश अनकर, संदिप उके, रविंद्र रहांगडाले, मुन्ना पटले, रविदास तुमसरे, शरद कापसे, एम.एम. पटले (मुख्याध्यापक), भोयर (मुख्याध्यापक), ठाकरे, बघेले, मेश्राम, बोपचे, सोनेकर, दिपीका पटले, वैद्य (मदतनीस), सुरेश नागपुरे (संगणक परिचालक), कविदास तुमसरे (परिचर), सचिन ठाकरे (रोजगार सेवक), शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य केले.