डव्वा येथे वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन

0
11

सडक-अर्जुनी :आमदार राजेंद्र जैन यांनी निवडलेल्या आदर्श ग्राम डव्वा येथे आमदार जैन यांच्या निधीतून प्रस्तावीत वाचनालय बांधकामाचे भूमीपूजन शुक्रवारी पूर्णा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार जैन, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, छाया चव्हाण, केतन तुरकर, पंकज पटले, सरपंच शारदा किरसान, उपसरपंच मंदा चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत डव्वा ग्रामपंचायतकडून पूर्णा पटेल व आमदार जैन यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पूर्णा पटेल यांनी याप्रसंगी गावकर्‍यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठय़ा संख्येत उपस्थित होते.