झुडपी जंगलाच्या जागेवर व्यायामशाळेचे बांधकाम

0
11

 

गोंदिया, दि. ५ : तिरोडा तालुक्यातील खैरबोडी ग्रामपंचायतीने नियमबाह्य कामाचा सपाटा लावला. झुडपी जंगल म्हणून राखीव असलेल्या जागेवर व्यायामशाळेचे बांधकाम सुरू केले. त्याचप्रकारे अनेक काम सरपंच नियमबाह्यरित्या करत आहेत, त्यांना पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी उपसरपंचांसह ग्राम पंचायतीतील सहा सदस्यांनी केली.
माहिती देतांना वाय.टी. कटरे म्हणाले, खैरबोडी येथील क्रीडा विभागाने व्यायामशाळा मंजूर केली. मात्र, ७०३ या गटात सुरू असलेले बांधकामाची जागा झुडपी जंगल म्हणून राखीव आहे. शासनाला दुसèया गटाचा सातबारा सादर करून बांधकाम राखीव जागेवर करण्यात येत आहे. यासंदर्भात उपसरपंच छाया बिसेन, योगेंद्र कटरे, गौतम मेश्राम, सुचता खंडाते, अंजिरा चामलाटे आणि संतोष पारधी यांनी सचिव आणि सरपंच यांना हे बांधकाम अवैध असल्याची सूचना केली. परंतु, सदस्यांचे न जुमानता सरपंचांनी स्वमर्जीने बांधकाम हाती घेतले. त्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. सरपंचांचे पती नोकरीवर असून त्यांनी घरकूल योजनेचा लाभ दहा वर्षांपूर्वी घेतला. असे असताना आता आपल्या सासरèयांच्या नावावर पुन्हा घरकूल मंजूर केले. त्याचप्रमाणे नाली बांधकामात देखील मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला. तत्काळ या प्रकरणी चौकशी करून सरपंचांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाय.टी. कटरे यांनी केली.