जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात तिरोडा तालुका टॉपवर

0
12

गोंदिया- कुटुंब नियोजन हे केंद्र्शासनाचे अत्यंत महत्वाचे धोरण आहे.मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली असुन सुद्धा अद्यापही कुटुंब नियोजनाची जबाबदारी बर्याचदा स्त्रीयांनाच पार पाडावी लागते. केंद्रशासनामार्फत कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागाला चालना देण्यासाठी शासनामार्फत पुरुष नसबंदी पंधरवाडा राबविण्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांनी दिली.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवाडाच्या अनुषगाने 10 डिसेंबर रोजी तालुका तिरोडाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे भव्य पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 34 पुरुषांची यशस्वी नसबंदी शस्त्रक्रिया पार पडली. सफल शस्त्रक्रिया सर्जन डॉ. अभय पाटील व त्यांच्या मदतीला डॉ. तुलसी भगत यांनी मोलाची साथ दिली.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा डॉ. स्वाती घोडमारे व तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता भोयर, डो. दिनेश मोट्घरे, डो.आदित्य दुबे,डॉ. पलाश शहारे, डॉ. रजनीश डोंगरे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडले.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता गावोगावी पॉम्प्लेट व दंवडीच्या माध्यमातुन जनजाग्रुती करण्यात आली. तसेच लोकांना जाग्रुत करण्यास तालुक्यातील पदाधिकारी यांनी महत्वाची भुमिका बजावली.
शिबिरा प्रंसगी सर्व कर्मचार्यांचे कामाचे नियोजन जबाबदार्या सोपविण्यात आल्या.
ऑपरेशन थिएटर विभागात विणा कुकडे, छबिता भगत,शालू पारधी, व बाभरे ई. आरोग्यसेविका यांनी काम पाहिले.
.इंजेक्शन विभागात प्रीती वडीचार, हेमलता पारधी , एस.के.पटले, अंजीरा पटले इ. आरोग्य सेविका होत्या.
नोंदणी विभाग भोजराज बोपचे व अनुपम बंन्सोड यांनी बघितले.
फॉर्म भरणे व ईतर कामे अनमोल चव्हाण ,गिरीष ठोंबरे,नेवारे, सार्वे, बोनमपल्लीवार, मकासरे, डहारे, राऊत ह्या आरोग्य सेवंकानी पार पाडले.तसेच शिबिरा दरम्यान आहाराबाबत देवेन्द्र पारधी, संजय नागपुरे , भरत रहांगडाले ह्या परिचरांनी चोख भुमिका निभावली.शस्त्रक्रिया शिबिर डॉ. आदित्य दुबे, डॉ. दिनेश मोटघरे, डॉ. संगीता भोयर, तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश धुर्वे, महेंद्र पारधी ,तालुका लेखापाल मनोज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडले.

शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविक, आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
– डॉ. स्वाती घोडमारे तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा

पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रियेने पुरुषांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेत कुठलाही फरक पडत नाही , कुठलाही अशक्तपणा जाणवत नाही, माणुस पुर्वी सारखाच कष्टाचे काम करु शकतो, बिन टाक्याची शस्त्रक्रिया अत्यंत कमी वेळेची शस्त्रक्रिया आहे, शस्त्रक्रिये नंतर दवाखान्यात भरती होण्याची गरज नाही लगेच डिस्चार्ज मिळतो, कमी त्रासाची, कमी वेळेची व जास्त मोबदला देणारी मिळणारी शस्त्रक्रिया असल्याने सर्व तालुक्यात अशा प्रकारच्या भव्य पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
– डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया