अडचण आल्यास पोलिसांची मदत घ्या-पोलिस अधीक्षक निलोत्पल

0
12

गडचिरोली- पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे काम किंवा अडचण आल्यास पोलिस स्टेशनची नेहमी मदत घेत चला, पोलिस स्टेशन तुम्हाला मदत करेल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केले.
सिरोंचा तालुक्यातील उपपोलिस ठाणे रेगुंठा येथे सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली १0 डिसेंबर रोजी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व माऊली सेवा मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानातून जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यातीन देशमुख तसेच माऊली सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष सुहास खरे उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलिसांना सहकार्य करणे तसेच पोलिस दादोलारा खिडकीच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना तुम्ही घेऊ शकता, याबाबतही माहिती दिली. माऊली सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष सुवास खरे यांनी पोलिस स्टेशन रेगुंठा यांनी आमच्याशी कसे संपर्क साधून जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन आम्हापयर्ंत पोहोचवल्या त्यामुळे आम्ही इतके चांगले काम करू शकलो. असे म्हणत पोलिसांचा कौतुक करून आभार मानले. असेच पुढेही आम्ही पोलिसांच्या मदतीने काम करू, असे आव्हाने केले.
कार्यक्रमास विठ्ठलराव पेठा, मोयाबीन पेठा, परसेवाडा नरसिंहपल्ली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावातील नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलिस उपनिरीक्षक निजाम सय्यद, पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अंमलदार व महिला पोलिसांमलदार, एसआरपीएफ ग्रुप जालनाचे पोलिस उपनिरीक्षक बच्चेवार, पोलिस उपनिरीक्षक, शेंडे यांनी पर्शिम घेतले.

आदिवासी महिलांना शिलाई मशिनचे वितरण

भामरागड-सीआरपीएफ ३७ बटालियन केंद्रीय राखीव पोलिस बलद्वारे सिविक एक्शन प्रोग्रामअंतर्गत तालुक्यातील अतीदुर्गम गावातील ५ गरीब आदिवासी महिलांना सिलाई मशिनचे वितरण करण्यात आले.
भामरागड तालुक्यातील अतीदुर्गम गावातिल गरीब आदिवासी महिलांना सिविक एक्शन प्रोग्राम अंतर्गत ३७ बटालियन केंद्रीय राखीव बल द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण उन्नती बहुउदेशीय महिला संस्था, अहेरीद्वारे ४ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत चालले. या प्रशिक्षणात सर्वात जास्त गुण मिळवलेल्या ५ महिलांना ३७ बटालियनद्वारे सिलाई मशीन आणि प्रमाणपत्र प्रदान दिले गेले. कार्यक्रमात ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले आणि हे प्रशिक्षण त्यांना आत्मनिर्भर बनवेल. सोबतच भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवून पुरुष आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ३७ बटालियन प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास द्वितीय कमान अधिकारी शिवकुमार राव, एनएसएमओ डॉ. श्रीनिवासुलू रेडी, सहायक कमांडंट तरुण डोंगरे, पोलिस निरीक्षक किरण रासकर, पोलिस उपनिरीक्षक विशा म्हेत्रे यांच्यासह गावातील नागरिक, पोलिस आणि सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.