जिल्हा आरोग्य अधिकारी पोहोचले अतिदुर्गम शेंडा आरोग्यवर्धिनी केंद्रात

0
16

गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातील अतिदुर्गम शेंडा आरोग्यवर्धिनी केंद्र व दल्ली उपकेंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी  ८ डिसेंबर रोजी आकस्मिक भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, आरोग्य सेविका बिसेन, आरोग्य सहाय्यक महेश पटले व इतर कर्मचारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र शेंडा येथील प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, माहेरघर, आंतररुग्ण वार्ड, औषधी साठा केंद्र आदीची पाहणी करून आरोग्यसेवा लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारणा करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारि यांना देण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे, सर्व कर्मचार्‍यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे, बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात, क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे, पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा, हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी. कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य करणे, जनआरोग्य समीतीच्या सभा नियमीत घेणे, कुपोषित अंगणवाडीतील बालकांचे तपासणी करुन कुपोषित बालकांना श्रेणीनुसार वर्गीकरण करून आवश्यक असल्यास गोंदिया येथिल एन. आर. सी. केंद्रावर भर्ती करण्याच्या सुचना दिल्या, टेलिकंन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकार्‍र्यांमार्फत योग्य नियोजन करणे, गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे, माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करुन १00 टकके कार्यक्षेत्रातील महिलांची तपासणी करून यादी करणे, आर्शमशाळेतील मुलांची आरडीके किटने मलेरियाबाबत तपासणी करणे, आदर्श गावातील १00 टक्के लोकांची रक्तातील साखरेची व रक्तदाबाची तपासणी करणे, आरोग्य विषयक जनजाग्रुती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे.
१९ डिसेंबरपासून नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, सर्व आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करून मुख्यालयी राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
भेटीदरम्यान त्यांच्यासोबत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, आरोग्यवर्धिनी समन्वयक डॉ. नम्रता दोहाते, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक पीयूष श्रीवास्तव उपस्थित होते.