एकजूट समाज ही खरी ताकद-खासदार ढालसिंग बिसेन

0
30

 : राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे अधिवेशन उत्साहात
वर्धा(कारंजा) : एकजूट ही प्रत्येक समाजाची ताकद आहे. एकजुटीने सर्व समस्यांची साेडवणूक हाेऊ शकते. ही एकजुटता हुशार विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी कामात आणावी, त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन बालाघाट- शिवनीचे खासदार ढालसिंग बिसेन यांनी केले.यावेळी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या संविधानात सुधारणेला मंजुरी देत समाज एकीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कारंजा (घा.) येथील भोयर-पवार समाज सभागृहात शनिवारी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या पवार, पाेवार, परमार, भाेयर,पवार समाजाचे अखिल भारतीय अधिवेशन पार पडले. त्यात ते उदघाटक म्हणून बोलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रिय अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे होते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रा. भगवान बग्नगरे हे होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ समाजसेवक शंकरलाल पवार, कारंजा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष भगवान बुवाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिता गाखरे,भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डाॅ. नामदेव राऊत,महासभेचे माजी अध्यक्ष टी.डी.बिसेन,उज्जैनचे वेदप्रकाश सिंग पवार, राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष राजेंद्र पटले,अशोक बिसेन,माजी अधिष्ठाता गौरीशंकर टेंभरे, महेंद्रसिंग परमार, प्रल्हाद सिंग परमार, श्रावण फरकाडे, प्रा. डॉ. तीर्थनंदन बनगरे,पृथ्वीराज रहांगडाले,अशोक पाठे, माजी प्राचार्य हेमंत ढोले, राज हरणखेडे, प्रभाकर देशमुख, द्वारका प्रसाद हरिणखेडे, महेश परमार,दिलीप पारधी,रुपेंद्र कटरे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांनी समाजाची बाेलीभाषा टिकविण्यासाेबत समाजाच्या चालीरिती जाेपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. अखिल भारतीय पंवार, पाेवार, परमार, भाेयर,पवार हे सर्व एकच असून सामाजिक व सांस्कृतिक चालीरीती एकच असल्याने व आपण एकच असल्यामुळे अखिल भारतीय स्तरावरही राेटी-बेटी व्यवहार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.देशाच्या कानाकाेपऱ्यातून आले समाजबांधव
या अधिवेशनात महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, हरियाणा आदी भागांतील समाजबांधव सहभागी झाले होते. प्रास्ताविक कारंजा तालुकाध्यक्ष भगवान बनगरे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय कार्याबद्दल नर्सींग अभ्यासक्रमात देशात 83 वा क्रमांक व राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गोरेगाव तालुक्यातील  कु. देवेश्री तेजराम पारधी तर चक्रवर्ती राजाभोज यांच्याप्रतिमेकरीता जागा दान दिल्याबद्दल संतोष बोपचे,पीएचडी प्राप्त केल्याबद्दल पत्रकार डॉ. गणेश खवसे, डॉ. योगेश किनकर आदींचा सत्कार करण्यात आला. संचालन इंदिरा कालभूत व एस.एम.पारधी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार किशोर हजारे यांनी मानले. यशस्वीतेकरिता राजेश डोंगरे, सुहास टोपले, बाबाराव मानमोडे, सारंग बनगरे, किशोर हजारे, हेमंत बन्नगरे, सचिन भादे, मोहन डोबले, रोशन चौधरी, गजानन चौधरी, टिकाराम चौधरी, टिकाराम घागरे, योगीता खवशी, संगीता डोबले, संगीता दिग्रसे, अनुसया डोबले, चंद्रकला चौधरी, ललिता घागरे, चेतना मानमोडे, हरिभाऊ धोटे आदींनी सहकार्य केले.