कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण प्रकरणात माजी खासदार अडसुळांचा निषेध

0
47

गोंदिया- राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि चतुर्थ श्रेणी गट ड सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष  भाऊसाहेब पठाण यांचे वर माजी खासदार आनंदनाव अडसुळ आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे सहकारी यांनी आकाशवाणी आमदार निवासात  महाराष्ट्र  मंत्रालय क्रेडीट सोसायटीतील कार्यालयास शिरुन त्यांचेवर बेकायदेशी कामे करण्यास दमदाटी केले. आणि त्यांचा गळा दाबुन पाण्याचे बाटलीन मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा तिव्र निषेध नोदवित असून माजी खासदार आनंदराव अडसुळ आणि त्यांचे संबंधित सहकारी यांना तात्काळ अटक करुन कठोर कार्यवाही  करण्यात यावी याकरीता राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पाथोडे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला.तसेच.उप जिल्हाधिकारी  स्मीता बेलपात्रे यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी. शहारे, सरचिटणीस शैलेश बैस, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल, उपाध्यक्ष कमलेश बिसेन, जिल्हा संघटक संतोष तुरकर, महासंघाच्या महिला उपाध्यक्ष कु. चित्रा ठेंगरी, महिला उप समितीच्या अध्यक्ष तेजश्वीनी चेटुले, रमेश नागपल्लीवार लिपीक संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर, कार्याध्यक्ष एन.यु.कावळे, सहसचिव अभिजीत बोपचे, आय.पी.गोमासे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगीरथ नेवारे, एन.आर. रामटेके, गुरबेले, आकाश चव्हाण, आशिष भोयर, कटरे, आदी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.