जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारला शिक्षक समितीचे आंदोलन

0
13

गोंदिया,दि.13- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने उद्या 14 मार्च सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालय व जि.प. कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाविरोधात व शिक्षकांच्या प्रलंबित समस्येसंदर्भात धरणे-निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात 20 पेक्षा कमी पटाची स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही शाळा बंद करू नये.1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षक-कर्मचार्यांना 1982 ची जुनी पेंशन योजना लागू करावी.28 आॅगस्ट 2014 च्या शासन निर्णयास अनुसरून संच मान्यता अंतिम करून सहाय्यक शिक्षक, विषय पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक पदे विनाविलंब भरण्यात यावे.विषय पदवीधर शिक्षकांना “पदवीधर शिक्षक” मंजूर करावे.अतिरिक्त घरभाडे भत्ता विनाविलंब लागू करावे.14 मार्च पासून शाळा सकाळपाळीत सूरू करावे.2 जानेवारीला नियुक्त झालेल्या शिक्षकांना एक वेतनवाढ लागू करावी. पदवीधर शिक्षक ,मुख्याध्यापक व केंद्रप्रमूख यांना एकस्तर पदोन्नतीनूसार एक आगावू वेतनवाढ लागू करावी.शासन निर्णयानूसार पदवीधर शिक्षक व 2002 मध्ये लागलेल्या शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करावी आणि बिंदुनामावली नुसार पदे भरण्याच्या मागणीला घेऊन हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मनोज दिक्षीत,एल.यु.खोब्रागडे,किशोर डोंगरवार आदींनी केले आहे.