मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप

0
24

गोरेगांव:-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रमुख योजना असून ह्या योजनेमध्ये काम करणारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा रोजगार सेवकांबरोबरच आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज18 जानेवारी बुधवारला संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवशीय संप पुकारलेला आहे. या संदर्भातील निवेदन गोरेगांव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत मागील दहा ते बारा वर्षांपासून प्रामाणिकपणे अखंडित मग्रारोहयोची कामे करीत आहेत.वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असून मग्रारोहयोची कामे वेळेवर पूर्ण करीत आहेत. त्याचप्रमाणे covid-19 अशा महामारीच्या काळात सुद्धा नियमित कार्यरत राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही शासकीय सुविधा नसतांना सुद्धा मग्रारोहयो अंतर्गत योजनांचे तालुक्यातील प्रत्येक गावांमधील प्रत्येक मजुरांना फार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून देऊन रोजगार दिलेला आहे. असे असतांना सुद्धा मागील तीन-चार वर्षापासून कंत्राटी कर्मचारी यांना कोणतेही मानधनात वाढ झालेली नाही.csc मार्फत नियुक्ती करण्यात आलेली असून वेळोवेळी संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकला,तरीपण सीएससी मार्फत कर्मचारी यांना किमान वेतन व वैधानिक फायदा दिला जात नाही. तसेच सदर कंपनी ईडीच्या जाड्यात अडकल्याची बाब पुढे आलेली आहे त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनरेगा अंतर्गत स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे.
पश्चिम बंगालच्या धर्तीवर देण्यात यावे.योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्यनिधी अशोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी.ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या.मध्यप्रदेश शाशनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.सदर मागण्या पूर्ण न झाल्यास 25 जानेवारीपासून असहकार आंदोलन त्यानंतर ही मागण्या पूर्ण झाल्यास 1 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देतांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (तहसील) हरेश कटरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (पंचायत) स्वपना ठलाल,तांत्रिक सहाय्यक हेमंत बघेले, प्रविण खरवडे, प्रवीण वालदे, राहुल ठाकरे , राहुल बागडे, नंदकिशोर चौधरी, नरेंद्र नागफासे, संदीप बिसेन, मन्साराम भगत, विजय पटले, विवेक शेंडे, शिवकुमार टेंभरे, सुनील बिसने, विजय राहांगडाले, अनिल हटीले,तुरकर आदी उपस्थित होते.