भात गिरणीच्या अध्यक्षपदी कांताबाई पाऊलझगडे, उपाध्यक्ष राकेश लंजे

0
27

अर्जुनी मोरगाव,दि.१८ : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची समजली जाणाèया दि.लक्ष्मी सहकारी धान गिरणी या संस्थेची आज शुक्रवारला ( १८) झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. काँग्रेसच्या कांताबाई दीपक पाऊलझगडे अध्यक्षपदी गुप्तमतदान पद्धतीने निवडून आल्या, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राकेश यशवंत लंजे अविरोध निवडून आले.

दि.लक्ष्मी सहकारी धान गिरणीची अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी संस्थेच्या कार्यालयात १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक घेण्यात आली. १३ संचालक असलेल्या संस्थेत अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या कांताबाई दीपक पाऊलझगडे यांनी नामांकन दाखल केले. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे राकेश लंजे यांचे एकमेव नामांकन होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे भोजराम दाजीबा रहेले यांनीही नामांकन दाखल केले. सर्व नामनिर्देशन पत्र वैध होते. विहित मुदतीत कोणत्याही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र परत न घेतल्याने अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. मतदानानंतर लगेच मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये कांताबाई दीपक पाऊलझगडे यांना १३ पैकी ११ मते मिळाली. भोजराम रहेले यांना १३ पैकी केवळ २ मते मिळाली. त्यामुळे कांताबाई पाऊलझगडे यांना अध्यक्षपदी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी राकेश लंजे यांचा एकमेव नामांकन असल्याने त्यांना अविरोध उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणुकीची प्रक्रिया अध्यासी अधिकारी नीलेश जिभकाटे यांनी पार पाडली.

दोन संचालक भाजपचे अविरोध निवडून आले होते, हे विशेष. या निवडणुकीत पाच संचालक काँग्रेसचे, तर पाच संचालक राष्ट्रवादीचे निवडून आणले होते. तर विजयqसह राठोड सुद्धा याच युतीमधून निवडून आले होते. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भागवत नाकाडे व यशवंत परशुरामकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त संचालकाची बैठक घेऊन या‘ध्ये काँग्रेसच्या कांताबाई पाऊलझगडे यांची अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित केले. उपाध्यक्षपदासाठी राकेश लंजे यांचे नाव निश्चित केले. मात्र राष्ट्रवादीचे भोजराम रहेले यांनी युतीचा प्रस्ताव धुडकावत अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले.