डासमुक्त व गटारमुक्त गावांची संकल्पना राबवा-सीईओ काळे

0
11

 

गोंदिया,दि.१9 : ग्रामीण विकासाच्या योजनांची माहिती गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना व्हावे त्याचसोबत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासोबतच शौचालयाचा नियमीत वापर करणे जेवढे महत्वाचे आहे.तेवढेच महत्व डासांच्या उत्पत्तीला रोखण्यास देणे गरजेचे आहे.हे करतांना आपली संकल्पना गटारमुक्त गाव अशी असणे अावश्यक असल्याचे विचार नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी व्यक्त केले.

ते  आज १९ मार्च रोजी कटंगीकला येथील मयुर लॉन येथे आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे  होत्या.पाहुणे म्हणून यावेळी खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे, समाजकल्याण समिती सभापती देवराज वडगाये, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम,जि.प.सदस्य खुशबू टेंभरे,गंगाधर परशुरामकर,सुरेश अंबुले यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.यावेळी सीईओ दिलिप गावडे यांनी प्रास्तविक करीत जिल्हातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी 516 ग्रामपंचायतीना 28 कोटी रुपये वितरीत केले असून येत्या 31 मार्चपर्यंत खर्च करावयाचे असल्याचे सांगितले.लोकसंख्येच्या आधारावर हा निधी वितरीत केला असून ग्रामविकास व स्वच्छता मोहीम हे आपले ध्येय असल्याचे सांगितले.सुरवातीला दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळ स्वच्छ भारत मिशनचे लोगो आणि टोल फ्री क्रमांकाचा शुभारंभ पालकमंत्री बडोले व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलतांना नांदेड जि.प.चे सीईओ काळे म्हणाले की,राज्यात सगळीकडे डासांच्या मुद्यावर चर्चा होऊ लागली आहे.कारण डासाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.आपण डासांना मारण्यासाठी काम करतो,परंतु डासांची पैदासच कशी रोखता येईल याकडे दुर्लक्ष करुन बसलो.डांसाची पैदास रोखण्यासाठी सर्वात आधी नाल्या,गटारामध्ये साचलेला पाणी वाहते करणे किवा शोषखड्डा खोदून तो पाणी कसे मुरविता येईल याकडे प्राधान्य देणे गरजेचे आहे.20-22 दिवसात डासांची निर्मिती होती ती सुध्दा पाण्यात.पाण्याशिवाय डास अंडी घालत नाही.त्यामुळे पाणी अंडी घालण्यासाठी डासांना मिळालेच नाही तर डास तयार होणार नाही,यासाठी आपण सर्वांनी डासमुक्त गावासोबतच गटारमुक्त गावाची संकल्पना राबविल्यास आरोग्याची समस्याच उदभवणार नाही असे म्हणाले.यावेळी ग्रामविकासात चागले काम करणारे ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील 556 ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती.सोबतच विविध विभागाचे स्टाल सुध्दा लावण्यात आले होते.