महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

0
13

लाखांदूर, ता. २७ ः चिचाळ/ जैतपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारी रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.तत्पूर्वी, सकाळी पुष्पा सुरेश येनोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी करुणा एज्युकेशन सोसायटी मुरमाडीचे सचिव व्ही. डी. जांगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. डी. खोब्रागडे, वामनराव बोरकर, मुख्याध्यापक बी. एन. अंबादे उपस्थित होते. सांस्कृतिक व माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन ताराचंद चाैधरी यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी काशिनाथ सोनवाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून करुणा एज्युकेशन सोसायटी मुरमाडीचे सचिव व्ही. डी. जांगळे, अरविंद रंधये, विलास कांबळे, गोपाल उके, भारत टेंभुर्णे,ग्यानिरान कोल्हे, प्रमोद लांजेवार, दिलीप गहाणे, जयहिंद जांगळे, कलीराम वालदे, चैतराम किरणापुरे, शशिकांत दैठणकर कनिष्ठ महाविद्यालय बारव्हाचे प्राचार्य सोनपिंपळे, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम. आर. बोरकर, सेवानिवृत्त शिक्षक विनोद पिलारे, आर. पी. हत्तीमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य, साहसी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा विद्यमान आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. एन. अंबादे यांनी, तर संचालन सुमंतकुमार रामटेके यांनी केले. आभार शिक्षक वाय. एम. बरडे यांनी मानले. यशस्वितेसाठी शिक्षिका कु. हुमे, शिक्षक डोंगरे, साखरे, टेंभुर्णे, खोब्रागडे, चाैके यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

सत्कारमूर्ती माजी विद्यार्थी
स्वप्नील कोचे, मुकेश कोचे, प्रदीप कोरे, श्रीकांत दोनाडकर, मुनेश्वर कुकडे, अवी टेंभुर्णे, चंद्रशेखर बलगमवार, आशीष हुकरे, डाॅ. विलास शेंडे, राजू चाैधरी, प्रमोद लांजेवार, प्रशांत सोनवाने, मुरलीधर हत्तीमारे, लंकेश पागोटे, राजू गहाणे, ईश्वर हनवते, नरेंद्र गोमासे, संकेत खोब्रागडे, डंकेश साखरे, आकाश टेंभुर्णे.