‘स्पीक फॉर इंडिया’च्या व्यासपीठावर तरुणाईचा सूर

0
15

देशाला वर्क्तृत्त्वगुणांची मोठी परंपरा
गोंदिया,दि.03 – आजवर जगात वर्क्तृत्त्वामुळे क्रांती घडून आली आहे. आपल्याला या गुणाची मोठी परंपराच लाभली आहे. काळानुसार यात बदल झाले. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे प्रमाण वाढले. तरीही प्रत्यक्षरित्या व्यक्त होण्याची संधी फार कमी वेळ मिळते. ‘स्पीक फॉर इंडिया’ स्पर्धेमुळे ही संधी उपलब्ध झाली. आमच्या कलागुणांना वाव मिळाला, तरुणाईचा असा सूर  ‘स्पीक फॉर इंडिया’च्या व्यासपीठावरून उमटला.
गोंदिया शहरातील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयामध्ये गुरुवारी जिल्हास्तरीय फेरी झाली.जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांनी विविध विषयांवर आपली परखड मते मांडली. नावीन्यपूर्ण विषयांच्या दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडताना स्पर्धकांमध्ये चुरस रंगली होती.
देशभरातील सर्वांत मोठी अशी ‘स्पीक फॉर इंडिया’ ही वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. फेडरल बँकेच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. गोंदिया शिक्षण संस्थाव्दारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यायाचे प्राचार्य डाॅ.अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 64 विविध महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यापैकी 6 विद्यार्थ्यांची निवड झोनल राऊंडकरीता झाली.यामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूरचे विद्यार्थी मयुर नेताजी गावतूरे, रघू व्हेंडर तर गोंदियाच्या धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी मेघना कुसुंबे,सिमरन आसवानी,अंकित भगत,उन्नती काकवानी  व निधी तिवारी हे विजेते ठरले.

राज्यभरातील कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सभोवतालच्या घडामोडींवर व्यक्त होण्यासाठीचे व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना भोवतालच्या घटनांवर मतप्रदर्शन करता येते. देशासमोर असलेल्या मुद्द्यांबाबत जागृती घडवून, त्यामागील कंगोरे शोधून व त्याबाबतचा व्यापक दृष्टिकोन सादर करून विद्यार्थ्यांना स्वत:ची भूमिका मांडता येते. या स्पर्धेत विविध टप्पे असतील. ते सारे टप्पे यशस्वीरित्या पार करणारा विद्यार्थी व विद्यार्थिनी अंतिम विजेता, विजेती ठरणार आहे.स्पर्धेचे परिक्षण धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे इंग्लिश विभाग प्रमुख डॉ. शशिकांत बिसेन व हिंदी विभागाच्या प्राध्यापिका डॉ.सुषमा निकोसे यांनी केले.तसेच डॉ.जयंत महाखोडे,डॉ.शुभांगी नरडे,डॉ.राणे,प्रा.अवनी मेठी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम समन्वयक  डॉ. स्नेहा जैस्वाल यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.