‘अखंड भारत’ संकल्पनेचे खरे उद्गाते राजा भाेज

0
18

डाॅ. विलास फरकाडे : भाेयर, पवार महासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार
काटाेल : सध्यास्थितीत ‘अखंड भारत’ची हाक दिली जात आहे. अखंड भारतामुळे अनेक बाबींवर सहजपणे मात करता येऊ शकते. मुळात ही आजची संकल्पना नसून सर्वप्रथम आपल्या देशात ही संकल्पनात चक्रवर्ती राजा भाेज यांनी मांडली. त्यांना अखंड भारत अभिप्रेत हाेता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हिंदू राष्ट्र म्हणून आपणावर हाेत असलेले आक्रमण थाेपवून काढण्यासाठी छाेट्या – छाेट्या राज्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी या माध्यमातून केले. त्यामुळे हिंदू सुरक्षित राहिला. वाकड्या नजरेने कुणीही आपल्याकडे पाहू शकले नाही, इतके कर्तृत्व राजा भाेज यांचे हाेते, असे स्पष्ट मत इतिहासतज्ज्ञ प्रा. डाॅ. विलास फरकाडे यांनी व्यक्त केले.
काटाेलच्या राजा भाेज बाल संस्कार केंद्रात गुणवंत विद्यार्थी सत्कार, सेवानिवृत्त – ज्येष्ठ नागरिकांचा तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि स्नेहमिलन साेहळ्याप्रसंगी ते बाेलत हाेते. अखिल भारतीय भाेयर, पवार महासंघाच्या काटाेल शाखेतर्फे आयाेजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाेयर, पवार महासंघाचे नागपूरचे अध्यक्ष डाॅ. नामदेव राऊत हाेते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर, भाेयर पवार विद्यार्थी मंडळ कारंजाचे अध्यक्ष भगवान बन्नगरे, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाकरे, महासंघाचे सचिव माेरेश्वर भादे, नगर परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती लता कडू, किशाेर हजारे, भाेयर पवार युवा मंचचे अध्यक्ष श्रावण फरकाडे, पंचायत समिती सदस्य लता धारपुरे, मधुकर चाेपडे, वर्धा येथील भाेयर पवार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पाठे, किशाेर गाढवे उपस्थित हाेते.
पहिल्या सत्रात देशभक्ती गीतगायन स्पर्धा झाली. उद्घाटन नगर परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती लता कडू यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महासंघाच्या काटाेल शाखेचे अध्यक्ष वसंत खवसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सनबर्न म्युझिकल इव्हेंटचे वैभव देवपुजारी, ‘लाेकमत’चे प्रादेशिक विभाग प्रमुख डाॅ. गणेश खवसे, नरखेड शाखेचे अध्यक्ष अशाेक गाेरे यांची उपस्थित हाेते. संचालन काटाेल शाखेचे कार्याध्यक्ष मनाेहर पठाडे यांनी केले. आभार मदन ढाेले यांनी मानले.
आयाेजनासाठी महासंघाच्या काटाेल शाखेचे सचिव अर्जून कडवे, काेषाध्यक्ष ज्ञानेश्वर धारपुरे, ईश्वर घागरे, विजय डाेंगरे, डाॅ. विलास फरकाडे, अरुण मुन्ने, जगदीश खवसे, तारााचंद मुन्ने, श्याम मानमाेडे, श्याम बन्नगरे, दिलीप गाकरे, मधुकर रमधम, इंद्रजित बारंगे, शाेभा गाकरे, साधना गाेरे, अनिता देशमुख, पद्मा पाठे, मंदा भादे, वर्षा ढाेले, मंगला उघडे, वनिता गाेरे यांनी सहकार्य केले.
यांचा झाला सत्कार
कार्यक्रमात सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी विश्वनाथ गाखरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशाेक गाेरे, पत्रकारितेमध्ये पीएच.डी. प्राप्त करणारे ‘लाेकमत’चे प्रादेशिक विभागप्रमुख डाॅ. गणेश खवसे, इतिहासमध्ये पीएच.डी. प्राप्त याेगेश किनकर,मूर्तीचे सरपंच माेहन मुन्ने, खराळाचे सरपंच राहुल कामडी, मासाेदच्या रंजू बारंगे, चिखलीचे राजकुमार चाेपडे, मन्नाथेश्वर देवस्थानचे सचिव प्रशांत काटाेले, गुणवंत विद्यार्थी सुमित गाेरे, संस्कार उघडे यांच्यासाेबत दहावीतील २०, बारावीतील १५, उच्च शिक्षण प्राप्त १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. साेबतच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेतील वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिरा वानखेडे, द्वितीय पंकज डाेंगरे, तृतीय विनाेद पठाण, कनिष्ठ गटातील शर्वरी भादे, जान्हवी ढाेले, प्रतीक्षा वंजारी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले.