‘भारत सरकारच्या विकासाचे 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023’ मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आजपासून

0
5

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन

भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो नागपूरचा उपक्रम

गोंदिया, दि.7 : माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, जिल्हा प्रशासन, गोंदिया व जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया यांच्या सहयोगाने दिनांक 8 ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे ‘‘भारत सरकारच्या विकासाचे 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023’’ या विषयावर मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन उद्या बुधवार (दि.8) सकाळी 10.00 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, पत्र सूचना कार्यालयाचे उप संचालक शशीन राय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रदर्शन १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री ७ या वेळेत नागरीकांसाठी निःशुल्क उपलब्ध राहणार आहे. सदर प्रदर्शनात ‘‘भारत सरकारच्या विकासाचे 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023’’ या विषयावर माहिती सांगणारे सचित्र छायाचित्र, तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरुपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहितीपट राहणार आहेत. आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, कृषि विभाग, महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आदी विविध विभागांचे माहितीपर स्टॉल राहणार आहेत. सदर प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो नागपूर व जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
00000