विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत अभ्यासासोबत सृदृढ आरोग्याकरीता योगा करावे-जॅकी श्राॅफ

0
17

गोंदिया-आज 9 फेब्रुवारी ही स्व.मनोहरभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. योगायोग असा की 9 फेब्रुवारी हा माझ्या वडिलांचा सुध्दा वाढदिवस आहे. विद्यार्थ्यांनी खुप परिश्रम घेऊन अभ्यास करावा. आपले आरोग्य सृदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज सकाळी योगा केला पाहिजे. लग्न करणाऱ्या जोडप्यांनी पहिले आपली रक्त तपासणी केली पाहिजे. एक-दुसऱ्यांचा मान-सन्मान केला पाहिजे. देशाची सेवा करण्यासाठी युवकांनी आपले योगदान दिले पाहिजे, असे अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले. श्राॅफ यांनी यावेळी विविध चित्रपटांचे डाॅयलाग सादर करुन विद्यार्थ्यांसह उपस्थितांचे मनोरंजन केले.माजी खासदार विजय दर्डा यांनी श्राॅफ यांनी प्रश्न आपण मुलाचे लग्न कधी करणार असे प्रेक्षक विचारत असल्याचा विचारला असता मजेदार उत्तर देत आधी आपल्या पोटापाण्याची सोय करावी नंतरच लग्नाचा विचार करायला हवे असे सांगितले.ते येथील धोटे बंधू सायंस काॅलेजच्या प्रागंणात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या 117 व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.